शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा! ‘त्या’ चुंबन प्रकरणात 15 वर्षानंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | बाॅलिवूडमध्ये आपल्या अप्रतिम कलाकारीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं नाव येतं.

शिल्पा शेट्टी अनेकदा विविध कारणांनी मोठ्या वादात सापडली आहे. अनेक कारणांनी तिला मोठ्या प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. परिणामी शिल्पा शेट्टी एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून देखील ओळखली जाते.

काही दिवासांपूर्वी शिल्पाचा पती राज कुंद्राला पाॅर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राज कुंद्राचं हे प्रकरण शिल्पाच्या अंगलट आलं होतं. तिच्यावर प्रचंड टीका देखील झाली आहे.

सध्या शिल्पा अडचणीतून बाहेर येत असल्यासारखं दिसत आहे. कारण तिला 2007 साली घडलेल्या एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे. 2007 साली शिल्पाला मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागल होतं.

प्रसिद्ध हाॅलिवूड अभिनेते रिचर्ड गेरे 2007 साली भारत दौऱ्यावर होते. दिल्लीत एड्स रोगाबाबत जागृतीच्या कार्यक्रमात गेरेनं चक्क लोकांच्या समोर शिल्पाला स्टेजवर किस केली होती.

सार्वजनिक ठिकाणी स्टेजवर वारंवार किस केल्यानं गेरे आणि शिल्पाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या प्रकरणी शिल्पावर गुन्हा देखील झाला होता.

शिल्पा शेट्टीविरोधात 2 गुन्हे राजस्थानमध्ये आणि 1 गुन्हा गाजियाबादमध्ये दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनं हे सर्व गुन्हे मुंबई न्यायालयाच्या कार्यकक्षेत घेण्यात आले होते.

सर्व बाजूंचा विचार करता आणि शिल्पानं घटनेनंतर लगेच आपली बाजू मांडल्यानं तिनं कोणतही चुकीचं काम केल्याचं आढळलं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. परिणामी शिल्पाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, शिल्पावर सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर त्वरित गेरेनं माफी मागितली होती. पण या घटनेनं शिल्पाचं मोठं नुकसान केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन

“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये” 

युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन 

‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य