मुंबई | भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत काश्मीरचा मुद्दा ज्वलंत आहे. मागील अनेक वर्षापासून पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याचं काम केलं.
पाकड्यांनी वेळोवेळी भारताविरूद्ध विष पेरल्याचं पहायला मिळालं आहे. अशातच पाकिस्तानने जागतिक मंच असलेल्या युनायेट नेशनमध्ये पुन्हा गरळ ओकल्याचं पहायला मिळालं आहे.
1989 पासून भारताने 96,000 काश्मिरी लोकांची हत्या केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी केला आहे.
भगव्या पक्षाशी संलग्न अतिरेकी हिंदू गट भारतात मुस्लिमांच्या हत्याकांडावर उघडपणे बोलत असल्याचा आरोप भाजपवर पाकिस्ताने केला आहे. त्यावर आता भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर घणाघाती टीका केली. भारतीय राजनयिक मधु सुदन यांनी पाकिस्तानला ओसामा बिन लादेनचं उदाहरण देत गप्प केलं.
जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण परिसर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पुढंही राहील, असं चोख प्रत्युत्तर मधु सुदन यांनी दिलं आहे.
पाकिस्तानमधील आदिवासी भागात कार्यरत असलेल्या तहरीक-ए-तालिबानला भारतीय गुप्तचर संस्थांकडून मदत मिळत असल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने घोषित केलेल्या दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक पाकिस्तानात असल्याचं मधु सुदन यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.
तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी ओसामा बिन लादेनसह इतर दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याची सनसनीत टीका देखील भारताने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् आमदार संदीप क्षीरसागर स्वत: झाडावर चढले!, वाचा नेमकं काय झालं
भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन
“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये”