“आम्हाला डुक्कर म्हणता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता”

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आता राज्यात सत्तापालट झालं आहे.

बहुमत चाचणीनंतर शिंदे सरकार अधिकृतपणे सत्तेवर आलं आहे. यानंतर अनेक बड्या नेत्यांनी अभिनंदन प्रस्ताव सादर केला.

शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी देखील अभिनंदन प्रस्ताव सादर करताना तुफान टोलेबाजी केली आहे. गुलाबराव पाटलांनी संजय राऊत व आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा साधला.

एकनाथ शिंदेंची बाजू सांगायला मातोश्रीवर गेलो तर संजय राऊत म्हणाले तुम्हीही तिकडे जा. आम्हाला गटारातील घाण, डुक्कर म्हटलं गेलं, असं गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलं.

ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नव्हती ते आम्हाला बोलतात. आम्हाला डुक्कर म्हणता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता. हे कोण सहन करणार?, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे एकटे महाराष्ट्रात फिरले. आदित्य साहेब मंत्री होते मात्र ते महाराष्ट्रात फिरले नाहीत, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तर शरद पवार, अजित पवार राज्यात फिरतात पण आमचे नेते का आले नाहीत, अशी खंत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर, ‘या’ व्यक्तीला जामीन मंजूर

‘सगळ्यात नशिबवान कोण तर ते देवेंद्र फडणवीस कारण…’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

“माझी टिंगल केली पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो”

मोठी बातमी! शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला