राज्यासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. सर्वत्र पावसाचा जोर वाढत असताना राज्यासाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

पुढचे पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान खात्याकडून मुंबई उपनगर भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांना इशारा जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड व बीड जिल्ह्यातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, आज मराठवाड्यातील काही भागात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात 6 व 7 जुलै रोजी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्हाला डुक्कर म्हणता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता”

मोठी बातमी! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर, ‘या’ व्यक्तीला जामीन मंजूर

‘सगळ्यात नशिबवान कोण तर ते देवेंद्र फडणवीस कारण…’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

“माझी टिंगल केली पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो”