“लाज वाटायली का? लाज वाटायली का?…”; सदावर्तेंची राऊतांवर जोरदार टीका

मुंबई | राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेली बहुचर्चित पत्रकार परिषद शिवसेना भवन येथे पार पडली. त्यानंतर राज्यात राजकीय वादाला सुरूवात झाली आहे. परिणामी आता पत्रकार परिषदेवर टीकाटिपण्णी चालू आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. अशातच आता प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेंनी राऊतांवर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषदेबद्दल सर्वांना सांगितलं होतं. आपण पत्रकार परिषदेत साडेतीन नेत्यांबद्दल बोलणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं होतं.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर आता राज्यात नवा वाद उद्भवला आहे. अशातच राज्यात चालू असलेल्या एसटी कामगारांच्या प्रश्नावर सदावर्तेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

सदावर्तेंनी राऊत यांची नक्कल केली आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी केसीआर यांच्या कानात प्रश्नोत्तर होणार नाहीत, असं सांगितलं होतं. त्यावरूनच सदावर्तेंनी नक्कल केली आहे.

केसीआर यांनी राज्यातील जनतेला काय सुविधा दिल्या आहेत?, ते केसीआर यांना विचारायला हवं होतं? तेव्हा लाज वाटायली का? लाज वाटायली का?, असा सवाल सदावर्तेंनी उपस्थित केला आहे.

सदावर्तेंनी सरकारवर टीका केल्यानंतर आपल्या पत्नी जयश्री पाटील यांच्या कानात नो क्वेशन-अन्सर असं म्हटलं आहे. परिणामी हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, एसटी विलिनीकरणाचा प्रश्न सध्या गंभीर होताना दिसत आहे. न्यायालयात विलिनीकरणावर सुनावणी होणार आहे. सदावर्तेंनी एसटी कामगारांच्या बाजूनं न्यायालयात लढा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…