“आरएसएस, रिपाई आपल्यासोबत, मी तुम्हाला विलीनीकरण मिळवून देतो”

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांची न्यायालयात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आझाद मैदानात जात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आरएसएस (RSS), रिपाई (RPI) आपल्या सोबत आहे. तुम्ही सगळे एक रहा, मी तुम्हाला विलीनीकरण मिळवून देतो. तुमचा लढा अतिरेक्याच्या समर्थनार्थ नाही, हिंदुस्थानच्या कष्टकऱ्यांचा लढा आहे, असं ते म्हणाले.

आपल्या लढ्याला दाऊद (Dawood Ibrahim) इब्राहिमचे लोक फुट पाडण्याचा प्रयत्न करतील. माझ्या छातीवर गोळ्या झाडतील. पण हा लढा आपण शेवट पर्यँत लढू, असंही त्यांनी म्हटलं.

तुम्ही कोणत्या जातीमुळे तुटू नका. तुमची जात-धर्म कष्टकरी आहे. तसंच तुमची आमची आई एक आहे, ती म्हणजे भारत माता. अजित पवारांमुळे एका कष्टकऱ्याने आत्महत्या केली. ते न्यायालयाला सांगितलं. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना अजित पवारांनी (AJit Pawar) विधीमंडळात हा विषय कसा काढला, असा प्रश्न मी न्यायालयात उपस्थित केल्याचं सदावर्ते यांनी यावेळी सांगितलं आहे.

दाऊद इब्राहिम मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी आहे. त्याची जमीन घेतल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक झाली आहे. त्याच्या समर्थनार्थ सगळे मंत्री आंदोलन करतात, हे निषेधार्ह आहे, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली.

दरम्यान, एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी 28 ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. मधल्या काळात सरकारकडून पगारवाढ करण्यात आली.

अद्यापही हजारो कर्मचारी संपावर ठाम आहेत. या संपाला आता त्यांनी दुखवटा असं नाव दिलं आहे. त्यामुळे अद्यापही राज्यातील एसटी पूर्ण क्षमतेनं रस्त्यावर उतरू शकलेली नाही.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवरुन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबरमध्ये तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.

या समितीच्या शिफारसींचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करावा आणि मुख्यमंत्र्यांचे मत उच्च न्यायालयात सादर करावं आणि ही संपूर्ण प्रक्रिया 12 आठवड्यात पूर्ण करण्याबाबत शासन आदेश काढण्यात आला होता. पण दिलेली मुदत संपूनही अद्याप हा अहवाल कोर्टात सादर झालेला नाही. उलट राज्य सरकारकडून अजून मुदतवाढ मागण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“जसं काय महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका भाग आहे, असं….” 

“नरेंद्र मोदींनी समोर येऊन रशिया-युक्रेन युद्ध थांबवावं…” 

“मी पुन्हा येईन यावर अनेकांचा विश्वास नव्हता पण…”

“मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, पण आता…”

आनंद महिंद्रांंनी केलं गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक, म्हणाले…