वर्तमानपत्रातील जाहिरातीवरुन सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर वाद चव्हाट्यावर?

चंद्रपूर | विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे पक्षातील नाराजांची संख्या वाढत आहे. सत्तेत असताना शांत असलेले भाजप नेते आता उघडउघड आपली नाराजी दाखवत आहे. भाजपचे माजी खासदार हंसराज अहिर यांनीही जाहिरातीतून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अहिर यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिलेल्या वर्तमानपत्राच्या जाहिरातीत आपला नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. त्यांनी चंद्रपूर येथील निकालावर भाष्य करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे मुनगंटीवार आणि अहिर वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे.

मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेआधी भाजप होता आणि नंतर काँग्रेस आलं यावर त्यांनी लक्ष वेधलं आहे. सर्व सत्तास्थाने भाजपच्या ताब्यात असताना देखील लोकसभेत भाजपचा पाडाव का झाला? असा सवाल अहिर यांनी विचारला आहे.

दरम्यान, हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये संख्य नाही हे वारंवार दिसून आलं आहे.  सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात हंसराज अहिर यांना लोकसभा निवडणुकीत कमी मतं मिळाली होती. त्यामुळे अहिरांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधल्याचे चर्चा आहे.

Newspaper advertisement of Hansraj Ahir, वर्तमानपत्रातील जाहिरातीतून खुली नाराजी, चंद्रपूरमध्ये अहिर आणि मुनगंटीवर वाद चव्हाट्यावर?

 महत्वाच्या बातम्या-