महाविकास आघाडीची खातेवाटपाची यादी मुख्यमंत्र्यांकडे; आज खातेवाटप जाहीर होणार!

मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. मात्र अजूनही खातेवाटप झालेलं नाही. चांगली खाती स्वतःकडे ठेवण्यासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. मात्र, खातेवाटपचा तिढा सुटला असून शुक्रवारी मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

गुरुवारी संध्याकाळी पुरातन बंगल्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. तब्बल चार तास चर्चा केल्यानंतर रात्री 11 वाजता सर्व नेते बाहेर पडले. त्यानंतर तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खातेवाटपाबाबतचे सर्व निर्णय झाले आहेत. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.

खातेवाटपासंबधी अंतिम चर्चा झाली आहे. चर्चा ही समाधानकारक होती. 95 टक्के मंत्रिपदं आणि पालकमंत्रीपदांबाबत आमचा निर्णय झाला आहे. उर्वरीत पाच टक्के कामकाज बाकी आहे. मुख्यमंत्री आज अंतिम निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीनंतर म्हणाले आहेत.

या बैठकीत आमची समाधानकारक चर्चा झाली. खातेवाटपाची यादी तयार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल. मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-