विश्वचषक विजेत्या महान खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई | भारताचा महान फिरकी गोलंदाज भज्जी म्हणजेच हरभजन सिंगने (Harbhajan Singh) शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजन सिंगने 1998 मध्ये पदार्पण केले आणि आता 23 वर्षांनी त्याने क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (Announcing his retirement from international cricket)

2011 च्या विश्वचषकात हरभजन सिंगची भूमिका महत्त्वाची होती. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि फायनलला श्रीलंकेविरूद्ध त्याने मोलाची कामगिरी करत भारताला विश्वविजेता बनवलं होतं. याच भज्जीने आज निवृत्तीची घोषणा केली.

हरभजन सिंगने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली आणि आज तो 41 वर्षांचा आहे. हरभजन सिंगने 1998 मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

त्यानंतर त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध त्याने वनडेमध्ये पदार्पण केले. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2015 सालापर्यंत त्याने 103 कसोटी सामन्यांमध्ये 417 बळी घेतले, तर दोन शतकांसह 2235 धावा केल्या आहेत.

त्याचवेळी, 236 सामन्यांमध्ये 269 विकेट घेतल्या आणि 1237 धावा केल्या. T20 मध्ये तर येथे त्याच्या नावावर 28 सामन्यात 25 विकेट आहेत.

हरभजन सिंग हा अनिल कुंबळे आणि आर अश्विन नंतर भारतासाठी तिसरा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे. तब्बल 7 वर्ष भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत होती.

हरभजन कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीचा सपोर्ट स्टाफ किंवा कोच बनू शकतो. मेगा लिलावात भज्जीही संघासाठी महत्त्वाची भूमिका असू शकते.

दरम्यान, क्रिकेटचं मैदान सोडून आता हरभजन राजकारणाच्या पीचवर उतरण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत हरभजनचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या –

प्रशासनाचा सावळा गोंधळ; कोरोना मृतांच्या यादीत केली ‘ही’ मोठी चूक

शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; ‘या’ सरकारने केली कर्जमाफीची घोषणा

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल