“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मेलेल्या उंदरासारख्या आहेत”

चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे. महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात चांगलीच चुरस दिसत आहे. सर्व नेते एकमेकांवर टीका करत आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री खट्टर यांची जीभ घसरल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री खट्टर यांनी सोनिया गांधींची तुलना मेलेल्या उंदरासोबत केली आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी संपूर्ण देश फिरला. पण डोंगर पोखरला आणि त्यात मेलेला उंदीर मिळाला, असं खट्टर यांनी सेनापती येथील सभेत म्हटलं आहे.

भुपेंद्र सिंह हुड्डासारखे मोठे नेते आर्टिकल 370 हटवल्याचे समर्थन करतात, त्यांना त्यांच्या पक्षाचे समर्थन मिळत नाही. कारण काँग्रेस दहशतवादी मेल्यानंतर रडत असते. सोनीया गांधीही दहशतवाद्यांचे मृतदेह पाहून रडतात, असंही खट्टर म्हणालं आहे.

दरम्यान, हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरु आहे. या दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-