माण खटावमध्ये सर्वपक्षीयांचा प्रभाकर देशमुखांना पाठिंबा

सातारा | अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना सर्वपक्षीयांचा पाठिंबा आहे का, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कारण रविवारी वडूज येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. यावेळी प्रभाकर देशमुखांना पाठिंबा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे देशमुख यांच्या मागे सर्वपक्षीय उभे असल्याचं स्पष्ट झालं आहे.

वडूज येथील पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी), माजी आमदार दिलीप येळगावकर (भाजप), अनिल देसाई (भाजप), रणजित देशमुख (शिवसेना), संदिप पोळ (राष्ट्रवादी), एम. के. भोसले (काँग्रेस), मामुशेेठ विरकर (रासप), अनिल पवार (स्वाभिमानी शेतकरी संघटना), माजी सभापती संदिप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे आदी सर्वपक्षीय उपस्थित होते.

कोणत्याही परिस्थितीत माण खटावला लागलेली कीड उखडून काढायची आहे. मागील काळात मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे आता परिवर्तन घडवायचं आहे. देशमुखांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय, असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपचे जयकुमार गौरे आणि शिवसेनेचे शेखर गौरे यांच्याविरोधात माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारसंघात कोण बाजी मारतं याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-