हर्षवर्धन जाधवांचा सासरे रावसाहेब दानवेंना इशारा, म्हणाले…

मुंबई | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव या दोघांमधील वाद महाराष्ट्राला नवा नाही. जाधव यांच्याकडून दानवे यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेत. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना इशारा दिला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्यातून त्यांनी सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत.

रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मला त्यांना एकच सांगायचं आहे, यावर न्यायालयात जे काय व्हायचं ते होणारच आहे, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.

आपण मंत्री आहात, मोठ्या पदावर आहात, वाटेल ते केलं आहे आणि करणार आहात. मला सगळं माहित आहे. पण स्वाभिमानाचा झेंडा मी कधीच सोडणार नाही. आम्हीपण लखोजी जाधवांचे वंशच आहोत सोपं नाही, असं जाधव म्हणाले आहेत.

पल्याला जर वाटत असेल की, हर्षवर्धन झुकेल आणि आपल्या पायाशी लोटांगण घेईल तर असे होणार नाही. त्यामुळे मी मरण पसंद करील, जेलमध्ये जायला तयार आहे, पण स्वाभिमान कधीच गमवणार नाही, असं हर्षवर्धन म्हणालेत.

दरम्यान, याआधीही हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच दानवे यावर बोलणं नेहमी टाळत असल्याचंही पाहायला मिळतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही” 

’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती! 

“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल” 

करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या…