शाहू महाराज आज जिवंत असते तर CAA आणि NRC कायदा टराटरा फाडला असता- हसन मुश्रीफ

कोल्हापूर |  नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्याविरोधात संपूर्ण भारतभरातून तीव्र आंदोलने केली जात आहे. CAA कायदा पारित होऊनदेखील या कायद्याविरोधात आणखीनही आंदोलनं सुरूच आहेत. हा कायदा राज्यघटनेच्या गाभ्याच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. विविध राज्यांमधले प्रादेशिक पक्ष देखील या कायद्यांना विरोध करत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने देखील CAA आणि NRC चा कडाडून विरोध केला आहे.

शाहू महाराज आज जिवंत असते तर CAA आणि NRC कायदा टराटरा फाडला असता, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. हा कायदा राज्यघटनेच्या गाभ्याला धोका पोहचवणारा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप शासनाच्या काळात कोल्हापूरचा विकास रखडला होता. मात्र येत्या 5 वर्षात आता कोल्हापूरचा विकासाचा बॅखलॉग भरून काढणार असल्याचं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला मंत्रिपदाची संधी दिली आहे. या मंत्रीपदाच्या कार्यकाळात आणि माझ्या खात्यासंबंधी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रलंबित प्रश्न नेटाने सोडवण्यास माझं प्राधान्य असेल, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“भाजपच्या काळात बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास होत होता, आता विकासाची गाडी रूळावरून घसरलीये”

-मुख्यमंत्र्यांचं साई जन्मभूमीबाबतचं वक्तव्य खोटं; शिवसेना खासदाराचा घरचा आहेर

-आम्ही एकमेकांची ‘मेहबूबा’ म्हणणाऱ्या दानवे खोतकरांची लढाई पुन्हा सुरू होणार!

-“गांधी कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान करायचे होते म्हणूनच देशाची फाळणी झाली”

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पा तुम्ही एकत्र बसा आणि हा प्रश्न कायमचा सोडवून टाका”