“उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले हेच फडणवीसांना खुपतंय”

कोल्हापूर | काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्यानेच त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, असा टोला मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला आहे. तसेच फडणवीसांनी मनशांतीसाठी अध्यात्मिक पुस्तकं वाचावीत, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी जाहीर केलेली मदत तोकडी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. यालाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काही पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी पुस्तक वाचण्याचा माझा सल्ला धुडकावलेला दिसतो आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

माझी आजही त्यांना विनंती आहे की मौनः सर्वार्थ साधनम हे पुस्तक वाचावं. मनाला शांती लाभायची असेल तर मौन हा सर्वात उत्तम पर्याय आहे. प्रतिकुल काळात आध्यात्म हाच उपाय आहे. त्यांनी ही पुस्तकं वाचावी असाच माझा त्यांना सल्ला असेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“…म्हणून भारतात कोरोनाचा स्फोट होणार, जून अखेरपर्यंत देशात 16 लाख कोरोनाबाधित होतील”

-“दाऊद आतापर्यंत 6 वेळा मरून जिवंत झालाय, मोदी सरकारने काय ते एकदाच सांगावं”

-राऊतांच्या टीकेनंतर आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सोनू सूदचं मराठीमध्ये ट्विट, म्हणतो…

-लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींनी वैद्यकीय मदत कशी घ्यायची आणि होम आयसोलेशन कधीपर्यंत… वाचा

लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना आता ‘हा’ पर्याय, सरकारची महत्त्वाची माहिती