“…म्हणून भारतात कोरोनाचा स्फोट होणार, जून अखेरपर्यंत देशात 16 लाख कोरोनाबाधित होतील”

मुंबई |  तब्बल अडीच महिन्यांपर्यंत सारा देश लॉकडाउन होता. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अनलॉक करण्याची घोषणा केली. यामध्ये काही बाबींमध्ये शिथीलता आणली गेली आहे. परंतू लॉकडाऊन उठवल्याने भारतात जूनअखरेपर्यंत 16 लाख भारतीयांना कोरोनाची लागण होईल, असा धक्कादायक अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे.

3 जून, 5 जून, आणि 8 जून अशा दिवशी अनलॉक होईल, त्यानुसार अनेक गोष्टींमध्ये शिथीलता दिली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली. त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात देशभरात अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. तसंच जनजीवन पुर्ववत व्हायला सुरू झालं आहे. मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेने ही भीती घातल्याने लोकांध्ये एकच खळबळ माजली आहे.

7 मार्चला देशात 7 कोरोना रूग्ण होते. महिन्याभरात म्हणजे 7 एप्रिलला देशात 4 हजार 289 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. आणखी एका महिन्याने ही संख्या वाढून 42 हजार 836 वर पोहचली. तर 7 जूनला मात्र कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला. आजपर्यंत ही संख्या जवळपास अडीच लाखांच्या आसपास पोहचली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे नवनवे उच्चांक सुरू आहेत. दररोज 9 ते 10 हजार नव्या कोरोनाग्रस्तांची देशात नोंद होते आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतल्या कोरोनाबाधितांचा आकडा मोठा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“दाऊद आतापर्यंत 6 वेळा मरून जिवंत झालाय, मोदी सरकारने काय ते एकदाच सांगावं”

-राऊतांच्या टीकेनंतर आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सोनू सूदचं मराठीमध्ये ट्विट, म्हणतो…

-लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींनी वैद्यकीय मदत कशी घ्यायची आणि होम आयसोलेशन कधीपर्यंत… वाचा

लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना आता ‘हा’ पर्याय, सरकारची महत्त्वाची माहिती

-पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…