18 इंच उंचीचे साधू तुम्ही पाहिलेत का? जगातील सर्वात लहान साधूंचा व्हिडीओ नक्की पाहा

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एका साधूंचा व्हिडीओ खूप वेगानं व्हायरल होत आहे. या साधूंचं नाव नारायण नंद गिरी असं आहे. नारायण नंद गिरी साधूंचं वय 55 वर्ष आहे. मात्र त्यांची उंची केवळ 18 इंच एवढी आहे. 30 मार्च रोजी राऊटर्स या वृत्त संस्थेने यासंबंधीत वृत्त दिलं होतं.

राऊटर्सने ट्विटर वरून नारायन नंद गिरी यांचा व्हिडीओ शेअर केला आणि बघता बघता राऊटर्स यांची जगभर चर्चा सुरू झाली. आत्तापर्यंत 64 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या साधूंचा व्हिडीओ पाहिला आहे.

स्वामी नारायण नंद बाबांचं वजन केवळ 18 किलो एवढं आहे. नारायण नंद गिरी हे जगातील सर्वात लहान साधू असल्याचं मानलं जात आहे. हे साधू कुठेही चालू किंवा फिरू शकत नाहीत. त्यांचे शिष्यच त्यांची काळजी घेतात.

नारायण नंद गिरी महाराजांचे शिष्य नेहमीच त्यांच्यासोबत असतात. या महाराजांना उभे देखील राहता येत नाही. यामुळे साधूंचे शिष्य 24 तास त्यांच्याबरोबर असतात. राऊटर्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साधूंचा एक शिष्यच त्यांच्याविषयी माहिती देताना दिसत आहे.

हरिद्वारमध्ये 2021 महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. या कुंभसाठी जगभरातील साधू संत हरिद्वारमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. नारायण नंद गिरी महाराज देखील या कुंभला उपस्थित राहिले आहेत.

नारायण नंद गिरी महाराज मूळचे झांशी येथील रहिवासी आहेत. या साधूंनी नागा साधूंची दीक्षा प्राप्त केली आहे. दीक्षा प्राप्त करण्याआधी त्यांचं नाव सत्यनारायण पाठक असं होतं. नागा साधूंची दीक्षा प्राप्त केल्यानंतर सत्यनारायण पाठक यांना गिरी साधू म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

दरम्यान, या साधूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. यावर लोक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच या साधूंच्या दर्शनाला जगभरातील लोक येत असल्याचं देखील बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ देशाचे राष्ट्रपती महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायला गेले अन्…; पाहा व्हिडीओ

“आज मा.बाळासाहेब असते, तर पहिले आमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिले असते”

जाणून घ्या! लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी…

“सोडलेल्या हिंदूत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा…

‘…तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, गांगुली कधीच खेळू…