कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम

भिवंडी | देशातील बऱ्याच ठिकाणी महिला देहव्यापर करून आपल्या पोटाचा प्रश्न सोडवतात. या व्यापारात कोणी स्वतःहून येत नाही तर परिस्थिती त्यांना देहव्यापर करण्यास भाग पाडते. मात्र, भिवंडीमधील देहव्यापार करणाऱ्या स्त्रियांनी देहव्यापर सोडून एका संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य जगण्याची सुरुवात केली आहे.

भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथे 500हून अधिक स्त्रिया देहव्यापार करतात. श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती (सिंग) खान यांनी 4 वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या भागात सामाजिक आरोग्य विषयक कार्यास सुरुवात केली. या 4 वर्षाच्या काळात स्वाती (सिंग) खान यांचे येथील महिलांशी स्नेहाचे संबंध तयार झाले.

कोरोनाकाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या महिलांनीही आपला रोजगार असणारा देहव्यापार बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अनेक समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वाती (सिंग) खान यांनी या महिलांना धान्य, किराणा वाटप केले. त्याबरोबरच महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून येथील 25 महिलांना अगरबत्ती पॅकिंग, दिवाळी शोभेची लाईट बनवणे इत्यादींचे धडे दिले. या कामातून रोजगार मिळू लागल्याने यातील 4 महिलांनी देहव्यापार बंद करून सर्वसामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्यासाठी स्वाती (सिंग) खान यांनी या परिसरात 4 खोल्या भाड्याने घेऊन त्याला रंगरंगोटी करून महिलांच्या ताब्यात दिल्या. या घरांना ‘चिची हाऊस’ म्हणजेच बहिणीचे घर असं नाव देण्यात आलं. चिची हाऊसचा लोकार्पण सोहळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या हस्ते झाला. देहव्यापर करणाऱ्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने आत्मिक समाधान झाल्याचं स्वाती (सिंग) खान यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

“कोरोना झालेल्या रुग्णांना पुण्यात कोणी बेड देतं का बेड?”

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी जोडले हात; म्हणाले, “देवा माझी मदत कर!

अडीच वर्षात बापानंच एकामागून एक केली 5 मुलांची हत्या; काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार उघड

चीन जग हादरवणारी गोष्ट करण्याच्या तयारीत?; पाकिस्तानला बनवणार बळीचा बकरा!

कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका; असा शिकवला जबरदस्त धडा!