“रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर आता तरी झेंडा फडकवू नका”

मुंबई | एकीकडे देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना दुसरीकडे चांगलंच राजकीय नाट्य रंगलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. “अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर आता तरी मत मागणं थांबवा. रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर आता तरी झेंडा फडकवू नका.” असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. राममंदिराच्या भुमीपुजनावरून देशात चांगलाच गदारोळ उडाला आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सामानाच्या रोखठोक सदरातून सडकून टीका केली आहे.

मोदी सरकारवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले,” गुजरातमध्ये गोध्रा कांड घडले नसते तर आजच्या मोदींचे स्थान आणि रूप आपल्याला पाहायला मिळाले नसते. अयोद्धेनंतरच्या दंगलीने मुंबईसह महाराष्ट्रात हिंदुत्वाची लाट उसळली. तसेच साबरमती एक्स्प्रेसच्या गोध्राकांडानंतर मोदी हे हिंदुत्ववादी नेते म्हणून पक्के झाले. या दंगलीने मोदी यांना आधी हिंदूंचे नेते आणि नंतर देशाचे पंतप्रधान बनवले.”

राम मंदिराचा निकाल देणारे मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. राऊत म्हणाले, “पंतप्रधान पाकिस्तान चीनचा सीमावाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला. त्याचे श्रेय न्यायालयालाच द्यावे लागेल. राम मंदिर 28 वर्षाने उभे राहिले. या लढ्याने शरयू लाल झाली. शेवटी ज्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला ते मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई भगवे झाले आणि राज्यसभेत पोहचले.”

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम

आता मुख्यमंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण; म्हणाले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्या!

कोरोनाचे भयानक वास्तव! नोकरी सुटल्याने बापाने पोटच्या मुलाला विकलं!

“कोरोना झालेल्या रुग्णांना पुण्यात कोणी बेड देतं का बेड?”

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी जोडले हात; म्हणाले, “देवा माझी मदत कर!