‘ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून ‘तो’ मला प्यायला द्यायचा’; कंगनाचा धक्कादायक खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर बॉलीवूड क्वीन कंगना रनौतनं बॉलीवूड मधील अनेक वाईट गोष्टींविषयी जणू बंडच पुकारलं आहे. तिनं बॉलीवूड मधील अनेक वाईट गोष्टींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंतोडे ओढले आहेत. ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांतप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कंगनानंसुद्धा तिच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करायला सुरुवात केली आहे.

मी लहान होते तेव्हा माझ्या मेंटरने मला खूप त्रास दिला आहे. माझा मेंटर माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळत असायचा आणि ते ड्रिंक मला प्यायला द्यायचा. तो मला पोलिसांकडे जाण्यापासून सुद्धा रोखत होता, अशी माहिती कंगनानं ट्वीटरवरून दिली आहे.

मी माझ्या आयुष्यात जेव्हा मुव्हीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मी मोठ मोठ्या पार्ट्यांमध्ये जायचे. यावेळी मी ड्र.गची खूप खतरनाक दुनिया पाहिलेली आहे, असंही कंगनानं सांगितलं आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये को.किनचा सर्वात जास्त वापर केला जातो. कंगना जेव्हा पार्ट्यांमध्ये जायची तिथे हे ड्र.ग पार्टीमध्ये अनेकवेळा फ्री दिले जायचं. मात्र, नंतर त्यामध्ये एम.डीएमएचे क्रिस्टल मिसळून दिले जावू लागल्याची माहिती कंगनानं दुसऱ्या एका ट्वीटमधून दिली आहे.

कंगनानं तिला त्रास देणारा तो मेंटर कोण होता? याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तसेच कंगनानं बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्र.ग्जच्या काळ्या दुनियेविषयी माहिती देत भरपूर आरोप केले आहेत. मात्र, यामध्ये तिनं कोणाचंही नाव घेतलेलं नाही.

दरम्यान, ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांत प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कंगनानं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये बॉलीवूड मधील अभिनेत्यांची नार्कोटीक टेस्ट केली तर अनेकजण गजाआड जातील, असं कंगना म्हटली होती. बॉलीवूड क्वीन कंगनाचं हेच बेधडक वक्तव्य सर्वांनाच आवडत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या बाबतीत माझा एकच झाला तो म्हणजे…; रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन!

सुशांत प्रकरणातील डीलर समजला जाणाऱ्या गौरव आर्याचा मोठा खुलासा

“ रियाच्या कुटुंबाकडून सुशांतवर तीन महिने जादूटोणा चालु होता”

‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’; सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाकरे गरजले

महाडनंतर आता मुंबईतील नागपाड्यात इमारतीचा भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची शक्यता