सुशांतच्या बाबतीत माझा एकच गुन्हा झाला तो म्हणजे…; रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन!

मुंबई | देशात सध्या एकीकडे कोरोनाने उच्छाद मांडला असताना प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. सुशांतच्या प्रकरणाच्या केसचा तपास मुंबई पोलीस करत होते तेव्हा अनेक खुलासे होत होते. मात्र आत्ता ही केस सीबीआयला सोवपण्यात आल्यापासून अनेक धक्कादायक अशा गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

सुशांतच्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांचे सध्या जबाब येत आहेत. आत्ता तर सुशांत ड्र.ग्ज घेत होता त्यासोबतच तो गां.जाचेही सेवन करत असल्याची माहिती सुशांतचा स्वयंपाकी नीरज कुमारने दिली आहे. सुशांतच्या मृ.त्युला बॉलिवूडला जबाबदार धरलं जात होतं म्हणजे बॉलिवूडमधील घराणेशाही त्यानंतर इंडस्ट्रीतील कलाकार अभिनेता सलमान खान, निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक एकता कपूर यांची नाव घेतली जात होती.

अचानक मध्येच सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सुशांतचे पैशाचा वापर केला असल्याचा आरोप सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी केला होता. त्यानंतर सुशांतच्या प्रकरणाला नवा ट्विस्टच आला. त्यानंतर मात्र मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आला होता मात्र बिहारच्या पोलिसांनी सुशांतच्या प्रकरणाचा आमच्याकडे द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर तर बिहार सरकारने महाराष्ट्र सरकारवर टीका केली. अखेर त्यांनी एफआयआर दाखल केला होता.

राज्यातही भाजपनेही मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी केली होती. सीबीआयकडे हा तपास द्यावा ही मागणी जोर धरू लागली होती आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे देण्याचा आदेश दिला. सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर वेगाने तपासाला सुरूवात झाली.

जेव्हापासून सीबीआयकडे तपास गेला तेव्हापासूनही अनेक धक्कादायक असे खुलासे होत गेले आणि मात्र अनेक खुलासे झाल्याने सध्या सुशांतची केस आणखीनच गुंतागुंतीची झाली आहे. रियाची चौकशी चालू आहे तिनेही आपल्या जबाब नोंदवताना सुशांतच्या बहिणीवरसुद्धा आरोप केले आहेत.

रियाने सांगितलं होतं की मी एकदा सुशांतच्या घरी त्याच्या बेडवर झोपली होती आणि अचानक तेव्हा सुशांतची बहिण दारू पिऊन आली होती माझ्या अंगावर आली आणि माझ्यासोबत अंगाशी येडेचाळे करू लागली असल्याचं रियाने म्हटलं होतं. अशातच सुशांतच्या बाबतीत माझा एकच गु.न्हा झाला असल्याचं रियाने म्हटलं आहे.

माझा एकच गु.न्हा झाला मी सुशांतवर प्रेम केलं. तपासकार्यात मला जे जे विचारण्यात आलं त्याची मी सगळी उत्तरं दिली आहेत. काहीच लपवलं नसल्याचं रियाने म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांतला मा.रण्यासाठी रियाने वि.षप्रयोग केला असल्याचा आरोप सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणातील ड्र.ग डीलर समजला जाणाऱ्या गौरव आर्याचा मोठा खुलासा

“सुशांतच्या मृ.त्युपूर्वी रियाच्या कुटुंबाकडून सुशांतवर तीन महिने जादूटोणा चालु होता”

‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’; सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाकरे गरजले

महाडनंतर आता मुंबईतील नागपाड्यात इमारतीचा भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची शक्यता

काय सांगता! आलं केसांसाठी वरदान ठरू शकतं?; वाचा सविस्तर