भारत कोरोनावर नियंत्रण मिळवणाच्या स्थितीत; केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची गुड न्यूज

नवी दिल्ली |  देशात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. दिवसेंदिवस या आकड्यात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मात्र असं असलं तरी भारत कोरोनावर नियंत्रण मिळवणाच्या स्थितीत आहे, असं मोठं वक्तव्य देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन करून त्यांनी देशवासियांना मोठी गुडन्यूज दिली आहे.

देशात सध्या 2301 कोरोनाबाधित आहेत तर 56 जणांचा बळी गेला आहे. मात्र प्रशासन कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी दिवस रात्र काळजी घेत आहे. आपण कठीण काळात काम करतो आहे तसंच जनतेची देखील आपल्याला साथ लाभते आहे. इथून पुढेही जनतेची लाथ असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रूग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या योगदानाबद्दल आणि त्यागासाठी देश नेहमीच आपल्यावर अभिमान बाळगतो. तसंच ज्या कठीण काळात आपण काम करत आहात ते देश नेहमीच लक्षात ठेवेन, असं हर्षवर्धन म्हणाले.

आपणास कोरोना योद्धा होण्यासाठी एक संधी मिळाली आहे. आपण नक्की कोरोनावर येत्या काळात मात करून कोरोनाला पिटाळून लावू, असं हर्षवर्धन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली खेळाडूंशी मन की बात

-5 एप्रिलला मला तुमची 9 मिनिटे द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

-कोरोनामुळं शिख धर्मगुरुच्या मृत्यूनं खळबळ; क्वारंटाईन असताना गावोगावी केली प्रवचनं

-कोरोनाला रोखण्यासाठी मोदींचा मास्टर प्लॅन; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

-कोरोनाबाबत चीनचा अत्यंत धक्कादायक खुलासा