दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा- रोहीत पवार

 

मुंबई |  आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाची महामारी आल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा देशाला संबोधित केलं. प्रथमत: अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी थाळ्या आणि टाळया वाजवायला सांगणाऱ्या मोदींनी आज एक नवा उपक्रम सांगितला. त्या उपक्रमाचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे.

दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा, असं म्हणत त्यांनी मोदींच्या भाषणाचं स्वागत केलं. तर अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं नवं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या उपक्रमावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे. अगदी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला. आपल्या भाषणातून देशाच्या जनतेला दिलासा देण्याऐवजी देशाला मूर्ख समजण्याचं काम मोदी करत आहेत, असं आव्हाडांनी म्हटलं तर अशा थी की चुल्हा जलाने की बात करेंगे मगर मोदी ने दीया जलाने की बात कहीं, अशा शेलक्या शब्दात मलिकांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, 5 एप्रिलच्या रात्री भारतमातेचं स्मरण करायला मोदींनी सांगितलं आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-भारत कोरोनावर नियंत्रण मिळवणाच्या स्थितीत; केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची गुड न्यूज

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली खेळाडूंशी मन की बात

-5 एप्रिलला मला तुमची 9 मिनिटे द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

-कोरोनामुळं शिख धर्मगुरुच्या मृत्यूनं खळबळ; क्वारंटाईन असताना गावोगावी केली प्रवचनं

-कोरोनाला रोखण्यासाठी मोदींचा मास्टर प्लॅन; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना