‘…तर परिस्थिती चिंताजनक होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती

मुंबई | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर  राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता शाळा (School) पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी एक भीती व्यक्त केली आहे.

शाळा नियमित सुरू राहतील मात्र निर्बंध कटाक्षाने पाळावे. आज ओमयक्रोन आकडा शंभरीत असताना डबल ने वाढतोय, जर हजारावर आकडा जाऊन दुपटीने अशीच वाढ झाल्यास परिस्थिती चिंताजनक होईल, असं राजेश टोपे म्हणालेत.

ओमायक्रोनचा वाढता प्रभाव आणि शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाची गरज असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत. बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीसाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत. 24 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल असं पंतप्रधान म्हणाले. त्याची सुरुवात मात्र नव्या वर्षात 10 जानेवारीपासून करण्यात येईल असं मोदींनी जाहीर केलं.

महत्वाच्या बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, म्हणाले… 

“राज्यपालांचं उत्तर नाही आलं तरी अध्यक्षपदाची निवडणूक होणार” 

“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”

मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!