मुंबईच्या पावसाने बिग बींच्या घरात पाणी शिरलं!

मुंबई | मुंबईचा पाऊस नेहमीच अंदाज लावण्यापलिकडचा असतो. या पावसाळ्यात जोरदार पावसाने मुंबईकरांना अनेकदा झोडपून काढले. यात आता बॉलिवूडच्या सेलेब्रिटींचाही समावेश झाला आहे.

जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात देखील पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. स्पॉटबॉयमधील वृत्तानुसार बिग बींच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. पाऊस सातत्याने सुरू असल्याने आता हे पाणी बंगल्याच्या परिसरात देखील घूसत आहे.

प्रतीक्षा या आपल्या बंगल्यात अमिताभ पत्नी जया प्रदा, मुलगा अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्यासह राहतात. पाणी साठल्याने या सर्वांचं घराबाहेर पडणं देखील कठीण झालं आहे.

अमिताभ दर रविवारी आपल्या घराबाहेर चाहत्यांना बाहेर येऊन भेट देतात. याप्रमाणे त्यांनी या रविवारी देखील आपल्या चाहत्यांची भेट घेतली होती. त्या दिवशी पावसानेही हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या-