काळजी घ्या! मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ भागात रेड अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

आज राज्यातील अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने संपूर्ण कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यासह नाशिकमध्येदेखील अतिवृष्टीची शक्यता आहे. 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर या भागात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.

उत्तर केरळ ते गुजरात किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजारतमधील काही जिल्ह्यात देखील अतिवृष्टीच्या इशाऱ्यासह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, धो धो कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने महाराष्ट्रावर अतिवृष्टीची टांगती तलवार कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आमच्या पक्षाला कोणतीही विचारणा…’, शरद पवारांचा खुलासा

शिंदे सरकारची आज मोठी परिक्षा, बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?

…अन् पडत्या पावसात रावसाहेब दानवे वारकऱ्यांसाठी झाले चहावाले

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना लवकरच भेटणार?, शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे खळबळ

‘रूप पालटून फिरण्याचे शौकीन पंतप्रधान मोदी, पण आता फडणवीसही तेच करू लागलेत’; शिवसेनेचा टोला