आबाबा! रणवीर-दीपिकाने खरेदी केलं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

मुंबई | बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान जीवनाची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा करते. आपले लाडके कलाकार कसं जीवन जगतात हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोनची जोडी सर्वांचीच लाडकी आहे. रणवीर-दीपिकाची कोणतीही गोष्ट चर्चेचा विषय ठरते.

बॉलिवूडच्या या लाडक्या जोडीनं नुकतंच एक आलिशान घर खरेदी केलं आहे. रणवीर-दीपिकाने वांद्रे येथे ‘सागर रेशम’ या हिरव्यागार निवासी टॉवरमध्ये एका आलिशान अपार्टमेंटची खरेदी केली आहे.

या नवीन अपार्टमेंटमधून समुद्राचं सुंदर असं दृश्य दिसतं. या अपार्टमेंटसाठी रणवीर-दीपिकाने थोडे थोडके नाही तर तब्बल 119 कोटी रूपये खर्च केले आहेत. या घराची स्टँप ड्यूटीच 7.13 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

देशातील इतर कोणत्याही अपार्टमेंटच्या तुलनेत ही सर्वात महागडी डील आहे. 119 कोटींची मालमत्ता खरेदी केल्यानंतर रणवीर-दीपिका आता शाहरूख खान आणि सलमान खानचे शेजारी झाले आहे.

रणवीर-दीपिकाचं हे घर शाहरूखच्या मन्नत आणि सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या मधे आहे. सागर रेशम टॉवरच्या 16, 17, 18 आणि 19व्या मजल्यावर दीपवीरचा क्वाड्रुप्लेक्स आहे.

या घराचा कार्पेट एरिया 11,266 चौरस फूट आणि टेरेस 1300 चौरस फूट आहे. या आलिशान घरासोबत रणवीर आणि दीपिकाला 19 पार्किंग स्पॉट देखील देण्यात आले आहेत.

दरम्यान, रणवीर लवकरच रोहित शेट्टीच्या सर्कस व करण जोहरच्या रॉकी और राणी की प्रेम कहाणीमध्ये झळकणार आहे. तर दीपिका साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काळजी घ्या! मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ भागात रेड अलर्ट जारी

‘नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आमच्या पक्षाला कोणतीही विचारणा…’, शरद पवारांचा खुलासा

शिंदे सरकारची आज मोठी परिक्षा, बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?

…अन् पडत्या पावसात रावसाहेब दानवे वारकऱ्यांसाठी झाले चहावाले

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना लवकरच भेटणार?, शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे खळबळ