पर्पल कॅप पटकावणारा हर्षल पटेल मालामाल, ‘या’ संघाने केलं 10 कोटी 75 लाखांमध्ये खरेदी

बंगुळूरू | आयपीएल लिलावाला (IPL Auction 2022) आजपासून सुरूवात झाली आहे. दोन दिवसांच्या या लिलावात आज मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जात आहे. अशातच आता बंगळुरूसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.  (IPL 2022 Auction Live Updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या ‘पर्पल कॅप’ विजेत्या हर्षल पटेलला तब्बल 10.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. श्रेयस अय्यरनंतर हर्षलही 10 कोटी ग्रुपमध्ये सामील झाला आहे.

चेन्नई आणि हैदराबाद देखील बोली युद्धात होते. मात्र अखेर बंगळुरूने बोली जिंकली. गेल्या मोसमात सर्वाधिक 32 विकेट घेणाऱ्या हर्षलची मूळ किंमत 2 कोटी होती.

चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या रोमांचक बोलीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली. त्यामुळे आता बंगळुरूच्या संघात आनंदाचं वातावरण आहे.

मागील आयपीएल हंगामात हर्षल पटेलने 32 विकेट घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. विराटने योग्य ठिकाणी त्याला संधी दिल्याने त्याने संधीचं सोनं केलं आणि आता त्याला मोठी बोली लागली आहे.

दरम्यान, यंदा कोहलीने बंगळूरूचा राजीनामा दिल्यानंतर आता बंगळुरूची कमान कोण संभाळणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

रोहितसह सलामीला उतरणारा ‘हा’ स्टार फलंदाज आता लखनऊच्या ताफ्यात

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला संघात घेण्यात अपयश 

IPL 2022 Auction | शिखर धवनचा पहिला नंबर; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट