मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ

बंगळुरू | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला ओळखण्यात येतं. भारतीय क्रिकेट मंडळाकडून दरवर्षी आयपीएलचं आयोजन करण्यात येतं. पुढील महिन्यापासून आयपीएल 2022 सुरू होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं यावर्षी दोन नव्या संघांचा समावेश स्पर्धेत केला आहे. परिणामी ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. जगातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

आयपीएल 2022 साठी बंगळुरूमध्ये खेळाडूंची लिलाव प्रक्रिया चालू आहे. सुरूवातीलाच आक्रमक सलामीवीर शिखर धवनवर कोट्याधींची बोली लावण्यात आली आहे.

लिलाव प्रक्रिया अत्यंत रंगात आली असताना श्रीलंकन खेळाडू वंनिंदू हसरंगावर तब्बल 10 कोटींच्या पुढे बोली गेली असताना ऑक्शनर ह्युज एडमिड्स यांची तब्येत अचानक बिघडली आहे.

एडमि़ड्स यांना अचानक काय झाले आहे याची अद्यापी माहिती समोर आली नाही. पण ते ऑक्शन पुकारत असताना अचानकपणे खाली कोसळल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय ऑक्शनर म्हणून एडमिड्स यांना ओळखण्यात येतं. आयपीएलच्या लोकप्रिय ऑक्शनरमध्ये त्यांचा समावेश होतो.

ह्युज एडमिड्स यांनी जगभरात अनेक शहरांमध्ये विविध लिलाव प्रक्रिया पार पाडल्या आहेत. धर्मादाय, ललितकला, मौल्यवान वस्तू यांचा लिलाव करण्यासाठी एडमिड्स यांना बोलावण्यात येतं.

दरम्यान, बीसीसीआयची वैद्यकिय टीम सध्या एडमिड्स यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीबाबत अधिकृत माहिती देण्यात येणार आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला संघात घेण्यात अपयश 

IPL 2022 Auction | शिखर धवनचा पहिला नंबर; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

“राजभवानातील नाचणारे मोर हे डसणाऱ्या सापापेक्षा बरे”