“अरे वेड्या, असा कसा वाया गेलास तू, कोण होतास अन् काय झालास”

मुंबई | त्रिपुरामधील घटनेवरून भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदूंना टार्गेट केलं जातंय, असा आरोप भाजपने केला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलेलं दिसतंय.

अमरावती आणि मालेगाव हिंसाचारावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी पहायला मिळत होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका देखील केली होती.

संजय राऊतांच्या टीकेवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. भाजप कार्यालयात आज भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

राहुल गांधी यांना त्रिपुरा काय घडलं याची चांगलीच कल्पना होती. राहुल गांधी यांनी 9 तारखेला ट्विट केलं होतं. त्यानंतर 11 तारखेला मालेगावात मोर्चे निघाले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

एकाच वेळी एवढी लोकं कशी काय निघतात. या संपुर्ण प्रकराला सरकारचा पाठिंबा होता. सरकराचं समर्थन होतं. मालेगावात झालेली हिंसा हा एक प्रयोग होता, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे.

हिंदूंची दुकानं जाळली गेली, त्यावेळी महाविकास आघाडीचा एकही नेता बोलला नाही. त्यावेळी त्यांची तोडं शिवली होती का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांचं मला आश्चर्य वाटतं. एक गाण होतं, कोण होतास तू आणि काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, अशा काव्यमय ओळीत फडणवीसांनी संजय राऊतांनी खिल्ली उडवली आहे.

नवाब मलिकांचा तर काही प्रश्नच नाही, हर्बल तंबाकू वेगैरेमुळे, मुळात त्यांनी ठेवलंच, त्यासाठी आहे की प्रकरण बाहेर येऊ नये, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देशात अराजकता माजवण्यासाठी आणि मुस्लीम मतांचं धृवीकरण करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

भाजपने कधीच दंगल केली नाही. पण आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

‘कपडे काढले तरी निर्लज्जांवर परिणाम होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”

भाजप की काॅंग्रेस! कोल्हापूरच्या आखाड्यात कोणाचा पैलवान जिंकणार?

 “गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणणं म्हणजे हा गेंड्याचाच अपमान”

“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”