‘कपडे काढले तरी निर्लज्जांवर परिणाम होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई | मागील काही दिवसांपासून भाजपने विविध मुद्द्यावरून आक्रमक टीका केली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता भाजपने उचलून धरल्याने ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकीकडे एसटी कामगारांच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं असताना दुसरीकडे त्रिपुराच्या घटनेवरून महाराष्ट्रात अशांततेचं वातावरण आहे. भाजपने हिंदूंचा मुद्दा पुढे करत आता महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

भाजप कार्यालयात आज भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली, त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

मालेगावात झालेली हिंसा हा एक प्रयोग होता. देशात अराजकता माजवण्यासाठी आणि मुस्लीम मतांचं धृवीकरण करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

देशात सध्या धृवीकरण करण्याचा प्रयोग सुरू आहे. हिंदूंची दुकाने निवडून निवडून जाळली जातात, पण महाविकास आघाडीचा एकही नेता बोलत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

दुकान हे हिंदूंचं असो किंवा मुस्लीमांचं, पण एकतरी नेता बोलला का?, असा सवाल त्यांनी याावेळी उपस्थित केला आहे.

आम्ही दंगल करणारे लोक नाही, भाजपने कधीच दंगल केली नाही. पण आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे.

ठाकरे सरकारच्या काळात हजारो कोटींची लुटमार सुरू आहे. वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पहायला यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

सुधीर भाऊंनी चांगला प्रस्ताव मांडला. या सरकारचे कपडे काढले. पण सुधीर भाऊ यांचे कितीही कपडे काढले तरी निर्लज्जांना फार परिणाम होतो असं नाही, अशी जहरी टीका फडणवीसांनी केली आहे.

दरम्यान,  आपल्याला आता सरकारविरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”

भाजप की काॅंग्रेस! कोल्हापूरच्या आखाड्यात कोणाचा पैलवान जिंकणार?

 “गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणणं म्हणजे हा गेंड्याचाच अपमान”

“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

  ‘…तर होय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचा हात’; राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया