“अरे कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर आलं, त्यातही राजकारण करायला लाज वाटली नाही का?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलंन आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. याच मुद्यावरून आता भाजपने देखील आकमक पवित्रा घेतला आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळत चाललं आहे, आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि दुसरीकडे बेजबाबदार परिवहन मंत्री अनिल परब आपला मनमानी कारभार राबवण्याचं कारस्थान रचत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अरे कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर आले असताना तुम्हाला त्यातही राजकारण करताना लाज नाही वाटली का ?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आंदोलक कर्मचारी कामावर परत आले नाही तर नव्या कामगारांना कामावर घेणार, हा कुठला न्याय?, असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

दिवसरात्र आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत काही नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत काहीच नाही, पण निलंबन करण्यासाठी पुढाकार घेणारे हे मंत्री खऱ्या अर्थाने एसटी महामंडळाचे शत्रू आहेत, असंही पाटील म्हणाले.

निलंबनाच्या भीतीने एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांनी विष प्राशन केले. त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. अशा किती कर्मचाऱ्यांचा जीव घेणार आहात अनिल परब?, असं म्हणत त्यांनी अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

कर्ता पुरुष गेला की, संपूर्ण कुटुंब उध्वस्त होतं, ही गोष्ट तुम्हाला कधी कळणार? थोडीतरी संवेदनशीलता तुमच्या अंगी उरलेली आहे का?, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

राज्याची जी कार्यकारणी झाली त्यामध्ये आम्ही गुन्हेगारी हा विषय 20 हजार सभा घेऊन पोहचवणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

माजी गृहमंत्री तुरूंगात आहेत, माजी पोलीस आयुक्त फरार आहेत, राज्यात नेमकं चाललंय काय?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तपास यंत्रणा घटनेच्या चौकटीत राहून काम करतात, त्यामुळे आम्ही शरद पवारांच्या धमकीला घाबरत नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय, त्यांना वाटायचं भाजप…”

 ‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर

“आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई