अखेर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

मुंबई | लोकशाहीत सर्व निवडणुकांना समान महत्त्व देण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानं देशातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अशातच आता ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केला आहे. परिणामी आता गावागावात पारावर जुगलबंदी रंगणार आहे.

राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमधील तब्बल 7 हजार 130 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.

राज्यातील या ग्रामपंचायतीतील विविध कारणांनी रिक्त झालेल्या जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 तारखेला मतमोजणी होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. पण त्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक लागली आहे.

30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहेत. परिणामी नामनिर्देशनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी आता इच्छुकांची मोठी तारांबळ होणार आहे.

नामनिर्देशन पत्रांची तपासणी ही 7 डिसेंबरला होणार आहे. तर अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख ही 9 डिसेंबर असणार आहे. परिणामी ईच्छुक उमेदवार आतापासून तयारीला लागले आहेत.

एप्रिल 2020 ते मे 2021 यादरम्यान मुदत संपलेल्या 88, डिसेंबर 2021 ला मुदत संपलेल्या 18 तर नवीन स्थापन झालेल्या 7 अशा एकूण 113 नगरपंचायतींचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

आयोगानं या निवडणुकांबाबात मतदार याद्यांसंदर्भात देखील महत्त्वाची माहिती सांगितली आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीला राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं समजण्यात येतं. देशाचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास हा गावाच्या विकासावर अवलंबून असतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

 “दाऊद हे नाव मुस्लिमांचंच का? मराठ्यांमध्येही दाऊद आहेत”

‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर

“आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई