नवी दिल्ली | देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल 15 हजार 413 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर 306 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
देशात सद्यस्थितीस 4 लाख 10 हजार 461 कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 1 लाख 69 हजार 451 जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले 2 लाख 27 हजार 756 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 13 हजार 254 जणांचा समावेश आहे.
कोरोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध अखेर भारतात उपलब्ध झालं आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने यासंदर्भातला दावा केला आहे.
दरम्यान, या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. करोनाची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे.
306 deaths and highest single-day spike of 15413 new #COVID19 positive cases reported in India in last 24 hrs.
Positive cases in India cross 4 Lakh, stands at 4,10,461 including 169451 active cases, 227756 cured/discharged/migrated & 13254 deaths: Ministry of Health pic.twitter.com/s4xzVBykVF
— ANI (@ANI) June 21, 2020
महत्वाच्या बातम्या-
-‘भाईजानने कधीही कोणालाही त्रास दिला नाही’; ‘या’ काँग्रेस आमदाराचा सलमानला पाठिंबा
-‘ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केलं?’; संजय राऊतांचा मोदींना सवाल
-सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा; या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांचे जबाब
-सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणाला…