चिंताजनक! पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 823 रुग्ण

पुणे | पुणे जिल्ह्यात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक 823 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 24 जणांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे. याचबरोबर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 15 हजार 4 वर पोहचली आहे

कोरोनामुळे आतापर्यंत 584 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. पुण्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा देशात कहर सुरू असल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल 15 हजार 413 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.

दरम्यान, देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे; 24 तासांत सापडले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

-‘भाईजानने कधीही कोणालाही त्रास दिला नाही’; ‘या’ काँग्रेस आमदाराचा सलमानला पाठिंबा

-‘ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केलं?’; संजय राऊतांचा मोदींना सवाल

-सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा; या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांचे जबाब

-सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणाला…