रानू मंडलच्या ‘त्या’ गाण्यासाठी हिमेशने दिले इतके मानधन

मुंबई : सोशल मीडियामुळे रातोरात एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता या व्यक्तिंच्या यादीत अजून एका नावाची भर पडली आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या नावाचा समावेश झाला आहे. गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली आहे. या रेकॉर्डींगचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.  या एका गाण्यासाठी मंडल यांना हिमेश दिलेल्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. तो आकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल.

रानू ही मुंबईमध्ये राहणारी आहे. पतीच्या मृत्यूनंतर उदर्निवाह करण्यासाठी रानू वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. गाणे गाऊन मिळणाऱ्या पैशातून ती तिचे पोट भरत असे. काही दिवसांपूर्वी रानूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडीओमध्ये रानू रेल्वे स्टेशनवर भारतातील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाली.

एका वृत्तानुसार रानू यांनी रेकॉर्डींग स्टुडिओमध्ये गायलेल्या त्यांच्या पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने त्यांना जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले आहे. मात्र हिमेशने देऊ केलेले हे रानू स्वीकार करत नव्हत्या. मात्र हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले.

महत्वाच्या बातम्या-