राहुल गांधींनी पाकिस्तानला जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून दाखवला बाहेरचा रस्ता!

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावरुन पत्र लिहीलं होतं. त्या संदर्भात राहुल गांधींनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. माझे भाजप सरकारबरोबर अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र, जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मी स्पष्ट करतो, याबाबत पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत राहुल गांधींनी पाकिस्तानला सुनावले आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा झाली आहे, कारण जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना भडकवले जात असून पाकिस्तानचा या सर्वाला पाठिंबा मिळत आहे. या पाकिस्तानची जगभरात दहशतवादाचा मुख्य समर्थक म्हणून ओळख आहे, असं ट्वीट राहुल गांधीनी पाकिस्तानवर निशाना साधला आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यांवरुन पत्र लिहीलं होतं. या पत्रात जम्मू-काश्मीरमधील नागरिकांवर अत्याचार होत असल्याचा उल्लेख केला आहे.

राहुल गांधींच्या ट्वीटचा दाखला पाकिस्तानने दिला होता. जम्मू-काश्मीरमच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याही ट्वीटचा समावेश आहे. 

दरम्यान, भारताने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानची या मुद्द्यावरुन सततची नवनवीन खलबतं सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या-