नवी दिल्ली | भारतातील हिंदू मुली मुस्लिम मुलांना घेऊन जातात. त्यामुळे लव्ह जिहादपेक्षा मुस्लिमांना जास्त त्रास होतो, असं देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांनी म्हटलं आहे.
लव्ह जिहाद हा केवळ प्रचार आहे. यामध्ये मुस्लिम मुलींना जास्त धोका आहे. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून असे म्हणता येईल, की सुशिक्षित हिंदू मुली मुस्लिम मुलांना पळवून नेतात, असं ते म्हणालेत.
एसवाय कुरेशी यांनी केवळ लव्ह जिहादच नव्हे, तर हिजाब वाद आणि ईव्हीएम हॅकिंगवरही भाष्य केलं आहे. लव्ह जिहादमुळे मुस्लिमांचे अधिक नुकसान होते, असं कुरेशी म्हणालेत.
हिजाब हा कुराणचा भाग नाही, मात्र मुलींनी सभ्य-शालीन कपडे घालावेत, असा उल्लेख आहे. शीख नागरिकांना शालेय गणवेशात पगडी आणि सिंदूर लावण्याची परवानगी आहे, मग हिजाबचा त्रास का?, असा सवाल त्यांनी केलाय.
हिजाब आवश्यक आहे की नाही याचा निर्णय मौलवी घेतील, न्यायाधीश नाही, असं कुरेशी म्हणाले. तसेच जर शीखांना पगडी घालण्याची आणि हिंदूंना शाळांमध्ये सिंदूर लावण्याची परवानगी आहे, तर मुस्लिमांना हिजाब घालण्यापासून का रोखले जात आहे?, असा सवालही कुरेशी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, कुरेशी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादावर थेट काहीही बोलण्यास नकार दिला. मला कोणत्याही वादात पडायचं नाही, हा चित्रपट पाहिलाही नाही, मात्र मुस्लिमांचं चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव
पुढील 5 दिवस ‘या’ भागात उष्णतेची लाट; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
…अन्यथा पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
“17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे आमदार जेलमध्ये जाणार”
गुंतवणुकदारांना केलं मालामाल! ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ