‘हिंदुत्व म्हणजे मुस्लीम किंवा…’; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: द नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकात हिंदुत्वाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरून सध्या नवा वाद सुरू झाला आहे. आता या प्रकरणावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हिंदूत्ववाद आणि हिंदुत्व यात काय फरक आहे? या दोन्ही गोष्टी समान असू शकतात का? जर या दोन्ही गोष्टी समान आहेत तर या दोन्हीचं नाव समान का नाही? असा प्रश्नांचा भडिमार राहुल गांधींनी केला आहे.

आपण हिंदू शब्द का वापरतो, हिंदुत्व का वापरत नाही?, असंही सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. मात्र, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

हिंदूत्ववाद आणि हिंदुत्व या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोघांमधील फरक समजून घेण्याची आणि शोधण्याची गरज आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

या गोष्टींचा शोध घेण्यासाठी एक लोकांचा गट शोधण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. या दोन्ही गोष्टींचा फरक आपण जाणून घेतला तर आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लागू करू शकतो, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

हिंदूत्व म्हणजे शीख किंवा मुस्लिमांना मारहाण करणे नाही, पण अखलाकची हत्या करणं पण हिंदूत्व होतं का ? असा खोचक सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मी उपनिषदे वाचली आहेत. तुम्ही निरपराध माणसांना मारावे, असं कुठंही यात लिहिलेलं नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनमधील त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत.

कांग्रेसने कधीच आक्रमक पवित्रा घेत कधीच भाजप प्रमाणे विचारसरणीचा प्रसार केला नाही, भाजप आणि आयएसएस द्वेष पसरवणारे आहेत. मात्र, आमची विचारसरणी ही प्रेम आणि बंधुभावाची आहे, असं म्हणत त्यांनी आयएसएसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचं तत्वज्ञान अजूनही जिवंत आहे, पण आता त्यावर द्वेषाच्या तत्वज्ञानाचं सावट निर्माण झालंय, अशी खंत देखील राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर होणार गंभीर चर्चा

 “फुट पाडण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ नितेश राणेशी आहे”

“नवाब मलिक हा गद्दार, त्याला पाकिस्तानला पाठवा”

अनिल देशमुखांना मोठा धक्का! ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

कडक सॅल्युट! भर पावसात महिला अधिकाऱ्यानं तरुणाला खांद्यावर उचलून नेत वाचवले प्राण