हिंगणघाटच्या राक्षसाचं ‘हैदराबाद’सारखं काहीतरी करा- प्रणिती शिंदे

सोलापूर |  हिंगणघाट इथल्या प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रकार सोमवारी घडला. या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे. यावर हिंगणघाटच्या राक्षसाला ‘हैदराबाद’सारखा काहीतरी न्याय द्या, अशी मागणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

हिंगणघाटच्या घटनेप्रकरणी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. हिंगणघाट घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

पीडित मुलीची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल अशी मी प्रार्थना करते. मुलींची छेडछाड करणाऱ्यांचा जागीच बंदोबस्त केला पाहिजे. कायदा वगैरे असून या नराधमांची मानसिकता कधी बदलेल, हे माहिती नाही, असं त्या म्हणाल्या.

हैदराबादमधल्या डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून टाकणाऱ्या नराधमांचा हैदराबाद पोलिसांनी खात्मा केला होता. गुन्हा घडला त्याच ठिकाणी पोलिस चकमकीत ते मारले गेले होते. त्यानंतर ही बनावट चकमक आहे, असे आरोप देखील झाले होते. मात्र सर्वसामान्यांचा त्या कारवाईला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर अशीच शिक्षा इतर गुन्ह्यांमध्ये व्हायला हवी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-महात्मा गांधी काँग्रेससाठी ‘ट्रेलर’ असतील पण आमच्यासाठी ‘जीवन’- नरेंद्र मोदी

-“महाराष्ट्राच्या लोकांनी ज्यांना घरी बसवलं ते दिल्लीत जाऊन काय करणार?”

-सच्चा हिंदू मैदान सोडून कधीच पळत नाही; केजरीवालांची अमित शहांवर टीका

दिल्ली निवडणुकीनंतर शाहीन बाग जालियनवाला बाग होईल; ओवैसींचं खळबळजनक वक्तव्य

“थोडीशी माणुसकी असेल तर अण्णा हजारेंनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं”