वसईमध्ये शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच पाच वेळा आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूरांना कडवं आव्हान

वसई : विरार, वसई, नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे. वसई विधानसभेत 1990 पासून हितेंद्र ठाकूर 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत ठाकुरांना शह देण्यासाठी वसईतील भूमीपुत्र आणि व्यावसायिक विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन हितेंद्र ठाकूर यांना कडवं आव्हान उभं केलं आहे.

शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांनी काल (2 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्जही विकत घेतला असून ते 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच विजय पाटील यांनी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काँग्रेस वसईची जागा सोडणार नसल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.गेल्या 25 वर्षात हितेंद्र ठाकूर यांचे 3 आमदार, वसई विरार महापालिका त्यांच्या ताब्यात असतानाही त्यांनी येथील विकास केला नाही.

आजही वसई पाण्याखाली डूबते, महापालिकेत भ्रष्टाचार, जनतेचे मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याने येथील जनता त्रस्त आहे. त्यांना आता बदल हवा आहे. त्यामुळे मला शिवसेनेने एबी फॉर्म देताच वसई करांनी फोन आणि एसएमएस करून अभिनंदन केले, असं विजय पाटील म्हणाले.

दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी वसईचे चिमाजी आप्पा मैदान, पार नाका, झेंडा बाजार वसई तहसीलपर्यंत रॅली काढून वसईच्या प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

महत्वाच्या बातम्या-