गणेश नाईक होल्डवर, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय चाललयं???

ठाणे : राष्ट्रवादीतून भाजपच्या गटात सामील झालेले नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत स्थान मिळालं नाही. त्यामुळे नाईक यांना होल्डवर ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेमका विचार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गणेश नाईक यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो विचार केला आहे. योग्य वेळी गणेश नाईक यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करतील आणि आपला निर्णय जाहीर करतील, असं उत्तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलं. चव्हाण यांनी कोकण पट्ट्यातील भाजप उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं.

गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र गणेश नाईक यांच्याबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे.

काहीही झालं तरी बेलापूरची आमदार मीच असेन, असं मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावेळी सांगितलं होतं. गणेश नाईक यांना पक्षात घेण्यासाठीही मंदा म्हात्रे यांचा विरोध होता. पण पक्षाकडून त्यांची समजूत घालण्यात आली.

मंदा म्हात्रे यांना तिकीट कापण्याची भीती होती, मात्र पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. परंतु गणेश नाईक यांना बेलापुरातून तिकीट मिळण्याची शक्यता असताना पहिल्या यादीत त्यांचं नाव दिसलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या-