लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना आता ‘हा’ पर्याय, सरकारची महत्त्वाची माहिती

मुंबई | सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाग्रस्तांबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय आहे.  सौम्य पद्धतीची लक्षण असलेल्या रुग्णांचे आता घरातच विलगीकरण केले जाणार आहे. राज्य सरकारने परिपत्रक जारी करत याविषयी सूचना दिल्या. याला होम आयसोलेशन असे संबोधले जाणार आहे.

कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

-भवानी पेठेने कोरोनाला हरवलं… पुण्यात रूग्णसंख्येत दहाव्या क्रमांकावर

-दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का?; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

-…तर परवडणाऱ्या दरात आणि अखंडित वीजपुरवठा होईल- उद्धव ठाकरे

-आईचा चिमुकलीला दम; उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांना का त्रास देताय?