पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे.
पुण्यात आज दिवसभरात 275 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आज 1649 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 275 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 7722 वर पोहचली आहे.
पुण्यात आता अॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2413 एवढी आहे. तर आज दिवसरात 259 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 06 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पुण्यात 195 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भवानी पेठेने कोरोनाला हरवलं… पुण्यात रूग्णसंख्येत दहाव्या क्रमांकावर
-दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का?; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…
-…तर परवडणाऱ्या दरात आणि अखंडित वीजपुरवठा होईल- उद्धव ठाकरे
-आईचा चिमुकलीला दम; उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांना का त्रास देताय?
-उद्धव ठाकरेंचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया