कोरोनाला रोखायचं असेल तर घरातील फक्त ‘या’ पदार्थांचा करा वापर

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जगभरात थैमान घालायला सुरूवात केली आहे. कोरोनाला रोख्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर या सर्व गोष्टी बंधनकारक तर आहेतच. मात्र, कोरोनाला आळा घालायचा असेल तर शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवणंही तितकंच गरजेचं आहे.

आपली इम्युनिटी चांगली असेल तर शरीर कोरोनाच काय कोणत्याही आजाराचा सामना करू शकतं. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तुही शरीराची इम्युनिटी वाढवायला मदत करतात.

घरात सहज उपलब्ध असलेली आणि औषधी असणारी हळद इम्युनिटी वाढवण्यासाठी खुप गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटी-इन्फेमेटरी गुण असतात जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात.

कोमट दुधात किंवा गरम पाण्यात हळद मिसळुन पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोणत्याही ऋतूत सर्दी, खोकला झाला तर हळदीच्या सेवनाने तो झटपट बरा होतो.

हिवाळ्यात होणारे वेगवेगळे आजार टाळण्यासाठी आणि शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी दालचिनीचा वापर करता येतो. कोरोनाला रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या काढ्यातही दालचिनीचा समावेश होता. चहा किंवा काढ्यातून आपण दालचिनीचं सेवन करू शकतो.

आहारात आवळ्याचा समावेश केला तर शरीराला हानिकारक घटकांशी लढण्यात मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळ्याची पावडर, आवळ्याचं लोणचं किंवा आवळा वाळवून खाणं अशा वेगवेगळ्या प्रकारे आवळ्याचं सेवन करता येतं.

घरात सहज उपलब्ध असलेलं आलं देखील इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. दुधात शिजवून किंवा पावडर बनवून आल्याचं सेवन करता येतं. ग्रीन टीमध्ये अर्धा चमचा आल्याची पावडर टाकून किंवा मधात मिसळूनही आल्याचं सेवन करता येतं.

आल्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर तेही शरीरासाठी अपायकारक असतं. त्यामुळे कोणत्याही पदार्थाचं प्रमाणात सेवन केलं तर त्याचे कोणतेही दुष्परीणाम होत नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

…तर राज्यात निर्बंध वाढवा, शरद पवारांनी दिल्या सूचना

तरूणाला oyo वरून रूम बुक करणं पडलं महागात, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

राज्यात कोरोनाचा शिरकाव; आठवड्याभरात तब्बल ‘इतक्या’ पोलिसांना कोरोनाची लागण

‘लस नाही, तर रेशनही नाही’; ‘या’ भागात नवे आदेश

‘कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काम करु नक’; ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा