पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ भागात अलर्ट जारी

मुंबई | वातावरणातील बदलांमुळे ऋतूमध्येही मोठा बदल जाणवत आहे. वातावरणात होणाऱ्या या बदलांमुळे अवकाळी पाऊस पडत असल्यातं चित्र आहे. सध्या ऐन थंडीतही पावसाची हजेरी पहायला मिळत आहे.

राज्यभरात कडाक्याची थंडी पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत. थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे.

या अवकाळी पावसामुळे लोकांचे बरंच नुकसान केलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आजपासून 7 जानेवारी 10 जानेवारीपर्यत पुन्हा पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 4 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशाच्या उत्तरेकडील भागात पाश्चात्य विक्षोभामुळे 6 to 10 जानेवारीला, काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, खाली दर्शविल्याप्रमाणे. 9 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी isolated places गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं वर्तवली आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळं बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

9 जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अ‌लर्ट देण्यात आलाय.

या अवकाळी पावसामुळं अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याशिवाय शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  तरूणाला oyo वरून रूम बुक करणं पडलं महागात, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

‘लस नाही, तर रेशनही नाही’; ‘या’ भागात नवे आदेश

‘कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काम करु नक’; ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा

रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट चांगलंच भोवलं, भाजप नेत्याची सहा तास चौकशी

मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती, राजेश टोपे म्हणाले…