वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. असं असूनही लॉकडाऊनचा नियम धाब्यावर बसवून अमिताभ गुप्ता या आयपीएस अधिकाऱ्याने एक विशेष पत्र उद्योगपती कपिल वाधवान यांच्या कुटुंबीयांना दिलं. या साऱ्या प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. सर्वसामान्यांना एक न्याय आणि बड्या धेंडांना एक न्याय असा प्रश्न लोक विचारू लागले होते. त्यानंतर अधिकारी गुप्ता यांच्यावर गृहमंत्र्यांनी कारवाई केली आहे.

मी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. गुप्ता यांची याप्रकरणी कसून चौकशी केली जाईल. तसंच जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

या पत्राच्या आधारे कपिल वाधवान यांच्या कुटुंबीयांनी खंडाळा ते महाबेश्वर येथे प्रवास केला. खुद्द गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिवांचं पत्र असल्याने पोलिस त्या पत्रापुढे काही करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या कुटुंबियांना प्रवास करू दिला. मात्र एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनीधीच्या ही बाब लक्षात आल्याने अधिकाऱ्याची चूक उजेडात आली.

दरम्यान, या साऱ्या प्रकारामुळे गृहमंत्री अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. तसंच उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याची माहिती आहे. तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

-“गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा”

-दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

-देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर; 24 तासात 549 नवे रुग्ण

-उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बेटा- सिंधुताई सपकाळ

-‘तुम्ही आम्हाला अडवलं का?’; औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना मारहाण