“गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा”

मुंबई |  गृह विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने उद्योगपती वाधवान यांना लॉकडाऊनच्या काळात फिरण्यासाठी पत्र दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एवढा मोठा प्रकार होऊनही गृहमंत्र्यांना माहिती कसं नाही. त्यामुळे त्यांचीच चौकशी झाली पाहिजे. अन् त्यांनी त्वरीत राजीनामा देणे आवश्यक आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच दोषी अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पॅरोलवर बाहेर असलेले कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोपी DHFL समुहाचे वाधवान कुटुंबीयांना CBI च्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्यानी त्यांना विशेष सवलत दिली, अशी टीका त्यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. असं असूनही लॉकडाऊनचा नियम धाब्यावर बसवून अमिताभ गुप्ता या आयपीएस अधिकाऱ्याने एक विशेष पत्र उद्योगपती कपिल वाधवान यांच्या कुटुंबीयांना दिलं. त्यानंतर अधिकारी गुप्ता यांच्यावर गृहमंत्र्यांनी कारवाई केली आहे.

मी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. गुप्ता यांची याप्रकरणी कसून चौकशी केली जाईल. तसंच जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

-दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

-देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर; 24 तासात 549 नवे रुग्ण

-उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बेटा- सिंधुताई सपकाळ

-‘तुम्ही आम्हाला अडवलं का?’; औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना मारहाण

-“फक्त आवाज द्या, ‘खाकी’ घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो”