मुंबई | राज्यात ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांमुळं वातावरण तापलं आहे.
फडणवीस यांनी राज्याच्या गृहविभागावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राज्यात आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे.
गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तत्कालिन कार्यकाळात राज्यातील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केल्याचं निदर्शनास आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
रश्मी शुक्ला यांची सध्या मुंबई पोलिसांकडूम चौकशी चालू आहे. याच प्रकरणात तत्कालिन गृहमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चर्चेत आहेत.
फडणवीस यांनीच शुक्ला यांना फोन टॅप करण्याचे आदेश दिल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्यानं खळबळ माजली आहे.
फडणवीसांनी सभागृहात व्हिडीओ फुटेज असलेला पेन ड्राईव्ह दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांना चिमटे काढले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरेंना विहीरीचा डेटा असणारा पेन ड्राईव्ह, सभागृहाला एक पेन ड्राईव्ह, आणखीन एक पेन ड्राईव्ह, फडणवीस साहेब तुम्ही डिटेक्टीव्ह एजेन्सी काढली आहे का?, असा सवाल वळसे पाटील यांनी विचारला आहे.
दरम्यान, फडणवीस आणि वळसे पाटील यांच्यात सभागृहात जोरदार जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्य सरकारकडून फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय
‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण