घरात दारु कशी बनवावी? लॉकडाऊनच्या काळात गुगलवर ट्रेंड

मुंबई | लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे दारुची दुकानंही बंद आहेत. जर कुठे अवैधरित्या दारुची विक्री होत असेल, तर त्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे तळीरामांना दारु मिळणं कठीण झालं आहे.

अनेकांनी दारु मिळवण्यासाठी वेगवेळ्या युक्त्या शोधण्यास सुरुवात केली आहे. घरात दारु कशी बनवावी?, लॉकडाऊनच्या काळात गुगलवर सध्या सर्वात जास्त हे सर्च केलं जात आहे.

सध्या तळीरामांनी बंद असेलेली दारुची दुकानं फोडून दारु चोरी करत आहेत, तर कुठे नशेसाठी सॅनिटायझरचाही वापर करत असल्याचं पुढे आलं आहे.

देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 हजारांच्या पार केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता तळीरामांच्या समस्या आणखी वाढणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…

-“देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारे आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ..”

-केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही पैसे मिळेनात -बाळासाहेब थोरात

-“परदेशातून आलेल्या 30 ते 40 लाख लोकांची चाचणी तेंव्हाच केली असती तर…”

-मोदी सरकार नकारात्मक आहे; शाहिद आफ्रिदीचा निशाणा