कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी ‘हे’ उपाय करा

मुंबई | चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसची सर्वत्र चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या विषाणूने एकूण 25 जणांचा बळी घेतला आहे. तर 830 जणांना या धोकादायक व्हायरसची लागण झाली आहे.

जागतिक आरोग्य संस्थेने भारत देशासोबतच अन्य देशांना देखील सतर्कतेचा इशारा देत हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. या व्हायरमुळे सामान्य लोकांचा बळी जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सर्दी किंवा फ्ल्यूसारखी लक्षणे असलेल्या लोकांशी संपर्क साधणं टाळा. तसेच हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा हँडवॉश कायम जवळ ठेवा. खोकताना रूमाल जवळ ठेवा.

दरम्यान, या व्हायरसचा धोका लक्षात घेत दिल्ली, मुंबई, कोलकाता या राज्यांच्या विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता कुणाला नाना, मामा दादा आणि काकाला घाबरायची गरज नाही- संजय राऊत

-जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धडक

-पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ काळाच्या पडद्याआड

-आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; चव्हानांनी घेतला आव्हाडांचा समाचार

-इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात…